पेट्रोल डिझेलच्या ‘शतकी’ खेळीने नागरिकांची ‘सीएन’जी गॅसला पसंती

0
39

गायत्री शेलार
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देशात पेट्रोल -डिझेल दरवाढीचा भडका कायम असल्याने , वाहनधारकांनी आपला मार्ग सीएनजीकडे वळवला आहे. पेट्रोल डिझेलने शतकी खेळी खेळयानंतर नागरिकांना आयुष्याच्या कसोटीत धावा करणे मुश्कील झाले आहे. यामुळे सीएनजीला नागरिकांनी पसंती दिली आहे.

केंद्र सरकारच्या पुढाकाराने शहरात स्वस्त आणि पर्यावरणपूरक असलेल्या सीएनजी गॅसचा पुरवठा करण्यात आला असून, मागील चार महिन्यांपासून शहरात सुमारे चाळीस ते पन्नास सीएनजी पंप सुरू करण्यात आले आहेत.

औद्योगिक भागाला आणि घरातील एलपीजी गॅसला स्वस्त पर्याय ठरू शकणारा घरगुती गॅसदेखील उपलब्ध करण्यात आला आहे. पारंपरिक क्रुड आॅइलचा वापर कमी व्हावा यासाठी स्वच्छ नैसर्गिक गॅसला प्रोत्साहन देण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. त्याअंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून नवव्या टप्प्यात १७४ शहरात सीएनजी गॅस वितरण सुरू करण्यात आले .

महाराष्ट्रात नॅचरल गॅसच्या माध्यमातून नाशिक, धुळे आणि औरंगाबाद येथे आता गॅस पुरवठा सुरळीत सुरू असून आहे. नाशिकसाठी पालघर येथून शंभर किलोमीटर गॅसवाहिनी टाकण्यात येणार असून, हे काम दोन वर्षांत पूर्ण होईल ; परंतु तत्पूर्वी नाशिक शहरात चाळीस ते पन्नास ठिकाणी सीएनजी पंप सुरू करण्यात आले असून त्यासाठी टँकरने गॅस पुरवठा सुरू आहे.

देशभरात दीड हजार सीएनजी पंप असून, ३२ लाख वाहने त्यावर चालतात. याशिवाय घरगुती गॅस पुरवठ्यासाठी थेट पाइपलाइनचा वापर केला जातो आणि गॅसमीटरच्या माध्यमातून बिलिंग केले जाते. घरगुती गॅसवर जनरेटर आणि एसीदेखील चालविला जातो. उद्योग आणि रिक्षासारख्या वाहनांसाठीदेखील हा स्वस्तातील पर्याय आहे. पेट्रोलपेक्षा स्वस्तसध्या पेट्रोल आणि डिझेल महाग होत चालले आहे. त्यामुळे इंधन वापराबाबत अडचण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सीएनजीचा स्वस्त पर्याय उपलब्ध आहे.

प पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत ३५ टक्के हे इंधन स्वस्त आहे. शिवाय पर्यावरणपूरक असून, वाहनांना जादा माईलेज मिळतो. घरगुती गॅसदेखील स्वस्त असून, अनुदानीत सिलिंडर साडेपाचशे रुपयांपर्यंत जाते तर सीएनजी साडेतीनशे रुपयांत पडतो.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here