पेट्रोलचे भाव होणार अजून कमी; सामान्यांना मिळणार दिलासा?

0
10

द पॉईंट नाऊ ब्युरो  ; ही बातमी सामान्यांच्या आशा, काहीशा पल्लवित करणारी ठरू शकते. पेट्रोलचे  (Petrol) भाव पुन्हा, कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जागतिक बाजार (World Market)पेठेत कच्च्या तेलाचे भाव, प्रति बॅरल (Barrel) मागे काहीसे कमी झाल्याने, पेट्रोल चे भाव पुन्हा कमी (Reduce) होणार, असे संकेत दिसताय.

भारतात (India) गेल्या बऱ्याच कालावधी पासून, इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणावर झाली. ज्यामुळे सामान्य नागरिक (People) अक्षरशः मेटाकुटीला आला.

कधी काळी 80 रुपयाच्या जवळ असणारे, पेट्रोल चे भाव 2021 संपायच्या कालावधी पर्यंत 115 रुपयांवर जाऊन पोहोचले.

तर डिझेल (Diesel) चे भाव देखील शंभरी पार करून गेले.

इंधनाच्या दरांमध्ये झालेल्या या भाव वाढीमुळे, केंद्र सरकारच्या (Central Government) बाबतीत सर्वच नाराज होते. त्यात विरोधी पक्ष (Opposition) देखील, सत्ताधारी पक्षाच्या हात धुवून मागे लागले.

नुकत्याच स्थानिक निवडणुका (Elections) पार पडल्या. त्यात केंद्रात सत्ता असणाऱ्या, भाजपला (BJP) मोठा धक्का बसला. मोठ्या प्रमाणावर भाजप चे उमेदवार पराभूत झाले.

याच दरम्यान दिवाळीच्या (Diwali) तोंडावर केंद्र सरकारने, पेट्रोल वर 5 रूपये आणि डिझेल वर 10 रुपयांनी कर कमी केला. ज्यामुळे इंधनाचे दर काहीसे खाली आले.

केंद्र सरकारने कर कमी केले. मात्र यावर विरोधी पक्षांनी, मोठ्या प्रमाणावर टीका केली. एकीकडे भाव गगनाला भिडवायचे आणि दुसरीकडे 5-10 रुपयांची सवलत द्यायची म्हणून, केंद्र सरकार वर टीका केली.

इंधन दर होणार कमी

इंधन दर हे जोवर 80 रुपयांच्या जवळ येत नाहीत, तोवर सामान्यांना दिलासा मिळणार नसल्याचे, मत सर्व सामान्य नागरिकांनी देखील व्यक्त केले होते.

केंद्र सरकारने कर कमी केल्यानंतर, बऱ्याच राज्यांनी देखील 7 रुपयांनी इंधनावरील कर कमी केले. ज्यामुळे इंधन दरात अजून सवलत मिळाली.

तर महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात अद्याप देखील, कोणत्याही प्रकारचे दर कमी करण्यात आलेले नाहीत. ज्यामुळे, आघाडी सरकार वर विरोधी पक्षांनी सडकून टीका केली. तर सामान्य नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली.

इंधनाचे हेच दर केंद्र सरकार द्वारे कमी केल्याच्या दिवसापासून आत्तापर्यंत इंधनाचे भाव स्थिर आहेत. अद्याप त्यापुढे वाढ झालेली नाही.

त्यात आता जागतिक बाजार पेठेत इंधनाचे दर कमी झाल्याने, पेट्रोल चे दर पुन्हा काहीसे कमी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं बोललं जात आहे.

जर जागतिक बाजार पेठेत इंधनाचे दर अजून कमी झाले, तर ते भारतात देखील अजून कमी होऊ शकतात.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here