द पॉईंट नाऊ ब्युरो : सातारा जिल्ह्यात एका मनसे कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या जळगाव येथे हा प्रकार घडला आहे. वैभव ढाणे असे या कार्यकर्त्याचे नाव आहे.
कोरेगाव तालुक्याच्या जळगाव येथे वाळू काढण्याच्या वादातून हल्ल्याचा प्रकार घडला होता. आणि याच रागातून 6 जणांनी वैभव ढाणे या मनसे कार्यकर्त्याची तलवार, कोयत्याने वार करत हत्या केली आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.
प्रशांत भोसले आणि वैभव ढाणे यांच्यात गावातील नदीतून वाळू काढण्यावरून वाद झालेला होता. या कारणातून मागील वर्षी वैभव ढाणे याच्यासह त्याच्या साथीदारांनी प्रशांत भोसलेवर हल्ला केला होता. याच कारणातून वैभव याच्यावर पूर्व वैमनस्यातून हा जीवघेणा हल्ला प्रशांत भोसले याच्यासह त्याच्या साथीदारांनी केला.
याप्रकरणी प्रशांत भोसले याच्यासह सहा जणांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव ढाणे याने मनसे चे तालुकाध्यक्षपद भूषविले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, घडलेल्या या घटनेने गावात घबराट पसरली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम