पुन्हा धडक कारवाई; बागलाण तालुक्यातील लखमापूरजवळ अवैध दारूचा साठा जप्त

0
15

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (बागलाण): बागलाण तालुक्यातील लखमापूर येथे पन्नास लाखांहून अधिकचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

केवळ गोवा राज्यात विक्रीची परवानगी असलेले मद्य सटाणा मार्गाने गुजरातकडे जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास मिळताच, त्यांच्याद्वारे ही कारवाई करण्यात येऊन दोघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.

गोव्यात तयार होणारे हे मद्य अवैधरित्या गुजरातकडे नेले जात होते. याबाबत ट्रकची तपासणी केली असता, वाहनचालकाकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नसल्याचे आढळून आले. त्यानंतर अवैध मद्य आणि ट्रकसह एकूण 50 लाखांहून अधिकचा माल जप्त करण्यात आला असून, दोघाना ताब्यात घेत हे अवैध मद्य खरेदी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here