पुन्हा एका विद्यार्थ्याने संपवले जीवन..

0
49

द पॉईंट नाऊ ब्युरो : मुंबई येथील एका आयआयटीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.

आयआयटी मुंबई येथील हॉस्टेल मध्ये हा 26 वर्षीय युवक राहत होता. तो पदव्युत्तर शिक्षण घेई होता. त्याने सातव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. याप्रकरणी या युवकाने लिहिलेल्या चिट्ठीत कोणालाही जबाबदार धरण्यात आलेले नाही. सदर युवक हा मागील काही दिवसांपासून नैराश्यामध्ये होता. आणि यातूनच त्याने आत्महत्या केल्याचं त्याने लिहिलेल्या चिट्ठीतून स्पष्ट झालेले आहे. या युवकावर उपचार देखील सुरू होते.

विद्यार्थी आत्महत्या घटना सध्या वाढू लागल्या आहेत. आताच एका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने देखील आत्महत्या केली होती. हा विद्यार्थी शारीरिक क्षमता चाचणीत एका गुणाने कमी पडला होता, म्हणून नैराश्यात होता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले होते. आणि आता पुन्हा नैराश्याच्या कारणानेच एका विद्यार्थ्याने आपली जीवनयात्रा संपवली. विद्यार्थी वर्गामधील वाढते नैराश्य हे जीवघेणे आणि चिंतेची बाब ठरत आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here