पुण्यात मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना ह्रदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली आहे. रविवारी रात्री उशिरा पर्यंत काम सुरू असताना र्कारशेडचे कामगाराचा ५० फूट उंचीवरून पडल्याने मृत्यू झाला आहे.
पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ मेट्रो कारशेडचे काम सुरु होते. त्याठिकाणी इतर कामगारांबरोबर मूलचंद्रकुमार सीताराम कार्यरत होते. तोल गेल्याने ५० फूट वरुन खाली पडले. त्यांनी सुरक्षाविषयक साहित्यही घातले असताना देखील जबर मार बसला होता. मूलचंद्र गेल्या तीन महिन्यांपासून पुण्यात मेट्रो रेल्वेसाठी काम करत होता.
मूलचंद्रकुमार सीताराम (रा उत्तर प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या व इतर कर्मचार्यांनी रविवारी रात्री तातडीने त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम