पुणे एटीएसकडून लष्कर-ए-तोयबाच्या 18 वर्षीय अतिरेक्याला अटक
पुण्यात घातपात करण्याचा मोठा कट रचलेला असताना एटीएसने तो उधळून दिला आहे. लष्कर-ए-तोयबासाठी काम करणार्या जुनेद मोहंमद (18) या तरुण हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असून न्यायालयाने 3 जूनपर्यंत त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.
पुणे एटीएसने दिलेल्या माहितीनुसार जुनेद मोहंमद हा जम्मू-कश्मिरातील गझवा ए हिंद या अतिरेकी संघटना आहे. गझवा ए हिंद ही लश्कर-ए-तोयबाचीच संघटना असून, ती कश्मिरात काम करते. सोशल मीडियाच्या माध्यमातून जुनेद मोहंमद या संघटनेच्या संपर्कात आला होता. या संघटनेने त्याच्या बँक खात्यात 10 हजार रुपयेही जमा केले होते.
जुनेद मोहंमद याला घातपात घडवून आणण्यासाठीच हा पैसे पाठवले असल्याची शक्यता एटीएसने व्यक्त केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून तो पुण्यात राहत होता. पुणे एटीएसने अटक केल्यानंतर खामगावात खळबळ उडाली आहे. जुनेदच्या खामगावातील घराचीही कसून तपासणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात एकच खळबळ माजली असून भीतीचे वातावरण समाजात निर्माण झाले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम