पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य

0
32

देवळा प्रतिनिधी : आयडीएफसी फर्स्ट भारत लि. व शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले.

आयडीएफसी फर्स्ट भारत लि. व शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक मदतीचा धनादेश विध्यार्थ्यांना सुपूर्द करतांना जोहान पॉल ,यशवन्त गोसावी समवेत प्राचार्य हितेंद्र आहेर आदी (छाया -सोमनाथ जगताप )

या कार्यक्रमासाठी सीएसआर विभागाचे कार्यक्रम अधिकारी जोहान पॉल अशोक, महाराष्ट्र विभागाचे विभागीय अधिकारी शरद देविदास देढे, देवळा येथील शाखा अधिकारी महेंद्र पाटील, शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. यशवंत गोसावी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हितेंद्र आहेर होते. निधी वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे नाशिक जिल्हा समन्वयक डॉ. डी.के.आहेर यांनी केले. याप्रसंगी प्रियंका गांगुर्डे, दिपाली महाले व वैभवी पवार यांना मदत निधी देण्यात आली.उपस्थितांचे आभार भारत पवार यांनी मानले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here