पिंपळगांवी स्व.डॉ.वसंतराव पवार यांना अभिवादन

0
43

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; पिंपळगांव (वा.) येथील मविप्र समाज संचलित जनता विद्यालयात संस्थेचे माजी सरचिटणीस स्व. आ.डॉ.वसंतराव पवार यांच्या स्मृती दिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य डि.के.कोल्हे होते.व्यासपीठावर पर्यवेक्षिका श्रीमती बिडवे मँडम,जेष्ट शिक्षक बी.बी.गिते,मनिष बोरसे श्रीमती एस.डी.आहेर , एम.डी.आहेर, व्हि.डी.निकम, बाळासाहेब सावंत, साहेबराव निकम, अशोक खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते.

पिंपळगांव जनता विद्यालयात स्व.डॉ.वसंतराव पवार यांना अभिवादन करतांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी (छाया – सोमनाथ जगताप )

याप्रसंगी प्राचार्य डी.के.कोल्हे यांच्या हस्ते स्व.डॉ.वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी शिक्षक मनोगतातून आर.एस.निकम यांनी स्व.डॉ.वसंतराव पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतीना उजाळा दिला.अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य कोल्हे यांनी डॉ वसंतराव पवार यांनी समाज व संस्थेसाठी केलेले शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला.याप्रसंगी श्रीमती जयश्री बिरारी,रोहिणी आहेर,बप्रियंका बच्छाव, भारती देवरे, हेमंत पवार, शिवाजी काटके,भुषण बच्छाव, गायकवाड, वरिष्ठ लिपिक गांगुर्डे, प्रभाकर पवार, सुनिल आहेर, माणिक देवरे, जालिंदर पानसरे, गोरख ठाकरे, आदि शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रविद्र निकम यांनी तर आभार बी.एस.सावंत यांनी मानले.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here