पिंपरी चिंचवड मध्ये अधिकारी नगरसेवकांच्या दारी ; आदेशांची पायमल्ली

0
46

द पॉईंट नाऊ ब्युरो : रयत विद्यार्थी परिषदेने पिंपरीचिंचवडचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे तक्रार करत. ‘ड’ प्रभागातील स्थापत्य विभाग उपअभियंता विनय ओव्हाळ आणि जलनिस्सारण विभाग ज्यु इंजिनीअर वर्षा कदम यांनी आयुक्ताच्या आदेशाचा भंग करून स्थानिक नगरसेवक प्रभाग क्रमांक 26 यांच्या जनसंपर्क कार्यालयमध्ये जाऊन बैठक घेतली. यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित माहिती स्थानिक नगरसेवकांनी स्वतःच्या समाज माध्यमातून प्रसारित केले. त्या व्हिडिओचा आणि फोटोचा आधार घेत. रायत्ने तक्रार केली आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर परवानगी न घेता खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी यांच्या घरी न जाण्याचा आदेश काढला होता. मात्र त्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत अनेक अधिकारी आणि कर्मचारी लोकप्रतिनिधी यांच्या घरी व जनसंपर्क कार्यालयात वारंवार जात असतात, हे सिद्ध झाले आहे. आपण या अधिका-यावर शिस्तभंगाची कारवाई करावी या अयोग्य पद्धतीस आळा घालावा. असे प्रकार वारंवार घडणार नाही. यासाठी या दोन अधिकाऱ्यांवर खडक कारवाई करावी अशी मागणी रयतेचे सुर्यकांत अर्जून सरवदे यांनी ईमेलद्वारे आयुक्तांकडे केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here