देवळा प्रतिनिधी : देवळा – मालेगाव रस्त्यावर पावजी दादा चौफुली (उमराणे ) जवळ कंटेनर व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटर सायकल स्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे .
याबाबत मिळालेली माहिती अशी कि , आज शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास
देवळा – मालेगाव रोड वरील पावाजीदादा चौफुली (उमराणे ) जवळ कंटेनर( क्रमांक एम एच ४६ /बी एफ ४५०८) व मोटर सायकल( क्रमांक एम एच ४१/ ए एच ८२२२) यांच्यात अपघात होऊन मोटर सायकल स्वार रघुनाथ पंढरीनाथ मोरे (३५) रा. उमराणे हा इसम जागीच ठार झाला आहे .या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे घटनास्थळी दाखल झाले . पोलिसांनी अपघात ग्रस्त कंटेनर ताब्यात घेतला असून ,देवळा ग्रामीण रुग्णालयात मयत रघुनाथ मोरे यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले.
देवळा पोलिसांत मोटर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ,अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्ग दर्शनाखाली सुरु आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम