नाशिक प्रतिनिधी: नाशिक शहरात महापालिकेकडून अडीचशे कोटी खर्च करून उड्डाणपुल उभारण्यात आला आहे. अडीचशे कोटी रुपये किमतीच्या या पुलावरून अनेक वाद-विवाद झाले. महापालिका मायको सर्कल व उंटवाडी येथे दोन उड्डाणपूल बांधणार आहेत. येथे असलेल्या उड्डाणपुलांसाठी वृक्षांच्या कत्तलीबाचा निर्णय अजूनही घेतला नाही.
उड्डाणपुलांसाठी ४०० झाडांच्या कत्तलीबाबत महापालिकेने प्रशासनाकडे मार्गदर्शन मागितले, तर २४ वृक्षांच्या कत्तलीनंतर त्यातील काही वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचे महापालिकेचा दृष्टिकोन आहे. नागरिकांचा विरोध, वाहतूक सर्वेक्षण न करताच उड्डाणपूल तयार केला जात असल्याच्या आरोपाने वादाला सुरवात झाली. महापालिकेने संबधिताना सूचना दोन्ही उड्डाणपुलांचे कंत्राट एकच नसून भिन्न असल्याचे सांगितले आहेत. वृक्षांच्या कत्तलीविरोधात नागरिकांचा आक्रोश वाढत आहे. उंटवाडी भागातील काही झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी मागणी केली जात आहे.
नागरिकांचा विरोध, वाहतूक सर्वेक्षण न करताच उड्डाणपूल तयार केला जात असल्याच्या आरोपाने वादाला सुरवात झाली. उच्च न्यायालयाकडून वृक्षतोडीसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे दिले आहेत. त्यात कोणते वृक्ष तोडावे व कोणते तोडू नये, स्पष्ट सूचना आहे. वृक्षप्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. दूरध्वनीद्वारे चर्चा करताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पुलाचे काम करताना दुर्मीळ व हेरिटेज वृक्षांची तोड न करता, नवीन डिझाइन तयार करण्याचे आवाहन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम