पर्यावरणाचा संदेश देत झाडाच्या फांदीत गणरायाची प्रतिष्ठापना.

0
45
सावकी ता देवळा येथिल जिल्हा परीषदेच्या हनुमाननगर शाळेतील शिक्षकांनी निसर्गाचा ऱ्हास टाळण्यासाठी चक्क वृक्षात साकारलेला गणपती (छाया - सोमनाथ जगताप )

सावकी ता देवळा येथिल जिल्हा परीषदेच्या हनुमाननगर शाळेतील शिक्षकांनी निसर्गाचा ऱ्हास टाळण्यासाठी चक्क वृक्षात साकारलेला गणपती (छाया – सोमनाथ जगताप )

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देव दगडात नाही. देवळातही नाही. ऑक्सिजन देणाऱ्या झाडात आहे. हा संदेश देत हनुमाननगर (सावकी) ता देवळा येथिल जिल्हा परीषदेच्या शाळेतील शिक्षकांनी संकल्पना मांडत पर्यावरणाचा संदेश देत लिंबाच्या झाडात गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे.

सावकी ता . देवळा येथिल जिल्हा परीषदेच्या हनुमाननगर शाळेतील शिक्षकांनी निसर्गाचा ऱ्हास टाळण्यासाठी चक्क वृक्षात गणपती साकारत त्याची प्रतिष्ठापणा केली.सध्या शाळा बंद शिक्षण सुरु या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय आवारात अध्यापन गणेश उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर निसर्गावर सर्वांनी भरभरून प्रेम केलं पाहिजे. या हेतूने शाळेचे मुख्याध्यापक अनंत देवरे व उपशिक्षक सोमनाथ शिवले यांनी विद्यार्थ्यांनी शालेय वयात वृक्ष संवर्धानासाठी संस्कार रुजवण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.

विद्यार्थ्यांना शालेय आवारात शाडु मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्याचे देखील प्रात्यक्षिक दिले होते मात्र विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जाणीव जागृती व्हावी म्हणून शालेय आवारातील लिंबाच्या झाडातच गणरायाची मूर्ती साकारली. लिंबाच्या झडला फेटा तसेच कार्डशिट पेपर पासून कान तसेच पोटाचा भाग तयार करत अतिशय सुंदर गणपतीची मूर्ती झाडात तयार केली.
एकही रूपयाचा खर्च न करता गणपती साकारला व तेथेच गणरायाची विधीवत स्थापना करत मी दगडात नाही.मी देवळातही नाही.सजीवसृष्टीला ऑक्सिजन देणाऱ्या झाडात आहे. झाडे लावा, पाणी वाचवा.
असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
त्यांच्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांनी तसेच शिक्षण विभागातून देखील कौतुक होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here