द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : आता एखादा परिचित पुरुष सोबत नसेल तर महिलांना प्रवास करता येणार नाही. असा फतवा तालिबानने काढला आहे.
अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचे शासन चालू आहे. तालिबानने आपली सत्ता स्थापन केल्यापासून आत्तापर्यंत अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. आणि हे सारेच निर्णय मुख्यत्वे महिला वर्गावर अन्याय करणारे आहेत.
आता तालिबानने महिला वर्गाने लांब पल्ल्याचा प्रवास करतांना, नातेवाईक पुरुषाला सोबत ठेवावे. महिला वर्गासोबत जर कोणी पुरुष नसेल, तर महिलांना प्रवास करू देऊ नये असे स्पष्ट आदेश तालिबान प्रशासनाने दिले आहेत. महिलांनी प्रवास करतांना, इस्लामिक हिजाब परिधान करावा. असे आदेश तालिबानने दिले आहेत.
तालिबानने आत्तापर्यंत महिला वर्गावर अन्याय करणारे अनेक आदेश दिले आहेत. महिला वर्गाचे शिक्षण, महिला वर्गाचे क्रीडा क्षेत्रातील स्थान, महिला वर्गाचे वस्त्र अशा सर्व बाबींवर तालिबानने वेगवेगळे फतवे काढून, महिला वर्गाचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे.
तालिबानच्या या नव्या फतव्याने महिला वर्गावर अजून एक अन्यायपूर्वक निर्णय लादला गेला आहे.
आतापर्यंत तालिबानने खूप अन्यायकारक निर्णय घेतले आहेत. या कारणास्तव मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी स्थलांतर केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम