मुंबई प्रतिनिधी: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. परमबीरसिंह यांच्यावर आतापर्यंत मुंबईत एक तर ठाण्यात दोन असे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे परमबीर सिंह यांना लवकरच लुकआऊट नोटीस जारी होणार असल्याचे समजतंय.
‘लुकआऊट’ याआधी देखील अनेक वेळा जारी केलेली आहे. कुख्यात गुन्हेगार, एखाद्या गुन्ह्यातील आरोपी किंवा गुन्ह्यासंदर्भात एखाद्या व्यक्तीविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली जाते. तपास यंत्रणांनी चौकशीसाठी बोलावले जाते, तेव्हा संबंधित व्यक्तीकडून यंत्रणांना सहकार्य मिळत नाही. तसेच संबंधित व्यक्ती परदेशात पळून जाण्याची शक्यता असेल, तेव्हा त्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली जाते. संबंधित व्यक्तीला देशाबाहेर जाण्यापासून रोखणे हा या नोटिशीचा उद्देश असतो. या नोटिशीच्या आधारे संबंधित व्यक्तीला कोणत्याही मार्गाने परदेशात प्रवास करता येत नाही. यामुळे परबीरसिंग यांना देखील ही नोटीस दिली, जाण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खंडणीप्रकरणात ठाण्यात त्यांच्यासह गँगस्टर रवी पुजारी, व अन्य काही पोलिस अधिकारी एकूण 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परमबीर सिंह हे गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणापासून रडारवर आहेत, मार्च महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे गंभीर आरोप परमबीरसिंह यांनी केले होते. त्यानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. तसेच सीबीआय, ईडीची कारवाई सुरू झाली. तर दुसरीकडे परमबीर सिंग यांच्याविरोधातही खंडणी, अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत. भाजपने परमबीर सिंह यांना हाताशी धरून महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा डाव आखला होता. असा आरोप आघाडीतील नेत्यांकडून केला जात आहे. तसेच परमबीर सिंह यांच्यावर अनेकांनी खंडणीचे आरोप केले आहेत, त्याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानुसार गुन्हा देखील दाखल झाला आहे.
परदेशात पळून जाण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींविरोधात ही नोटीस बजावली जाते. परमबीर सिंह यांच्याविरूध्द ही नोटीस जारी केल्यास अशी नोटीस बजावलेले ते शासकिय सेवेत असलेले पहिले अधिकारी ठरतील.
दरम्यान, केतन तन्ना यांच्यासह सोनू जलान आणि रियाज भाटी यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात गँगस्टर रवी पुजारी हासुद्धा आरोपी आहे. परमबीरसिंह यांच्यावर आतापर्यंत मुंबईत एक तर ठाण्यात दोन असे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. ठाणे पोलिसांनी तिघांचा 30जुलैला जवाब नोंदवून परमबीरसिंह यांच्यासह 28 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आठ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावांचा समावेश असून त्यामध्ये तत्कालीन ठाणे खंडणी विरोधी पथक प्रमुख प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे, एसीपी एन. टी. कदम, तसेच दोन पोलीस शिपायांच्या समवेश आहे. तसेच गँगस्टर रवी पुजारी याचेदेखील नाव यात आहे. त्यांच्या विरोधात जबरी चोरी, धमकावणे, खंडणी यांसारख्या दहांहून अधिक कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे राज्यात पुन्हा सरकार विरुद्ध अधिकारी संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम