परभणीतील शहीद शुभम मुस्तापुरेंच्या कुटुंबियांची मा. सैनिक विजय कातोरे यांनी घेतली भेट

0
11

राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : सांस्कृतिक कार्यक्रम,लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रमात अनेकांची उपस्थिती आज समाजात पहावयास मिळते परंतु देशाच्या रक्षणासाठी ऊन वारा पाऊस थंडी याची तमा न बाळगता कुटुंबाला बाजूला सारून निष्ठेने बर्फाच्छादित प्रदेशात डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करत चोवीस तास रक्षण करणाऱ्या भारतीय लष्करातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना भेट देणाऱ्यांची संख्या दुर्मिळच आहे.

शेवटी सैनिकांनाच सैनिकांची जाणीव असते त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती याची जाण देखील भारतीय सैन्यात काम करणाऱ्या सैनिकालाच असते याचाच प्रत्यय म्हणजे इगतपुरी तालुक्यातील सेवानिवृत्त माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या शहीद जवान, सैनिकांच्या कुटुंबियांना भेट देण्याचे सत्र राबविणारे इगतपुरी तालुक्यातील वाडीवरे येथील सेवानिवृत्त सैनिक विजय कातोरे आणि त्यांची संघटना.
दरम्यान परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील कोनेरवाडीचे जवान शुभम मुस्तापुरे हे ३ एप्रिल २०१८ रोजी जम्मु-काश्मीर च्या कृष्णा घाटी सेक्टर मध्ये आतंकवाद्याशी लढतांना शहीद झाले होते.

त्यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त इगतपुरी तालुक्यातील माजी सैनिक विजय कातोरे, व वीरनारी वीरमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक अध्यक्षा रेखा ताई खैरनार कल्पना ताई रौदळ, शैला ताई पाचरणे, सुभेदार मनोहर भोसले यांनी शुभम यांच्या परिवाराची भेट घेत श्री विजय कातोरे यांच्या सर्व टीमने विरपिता, व वीरमाता यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला व विचारपूस करत शहीद जवानांच्या कुटुंबातील आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक प्रश्नांची विचारपूस करत एक मदतीचा मोठा आधार सदर कुटुंबियांना दिला.
दरम्यान गेल्या वर्ष भरापासून मेजर विजय कातोरे आणि त्यांची माजी सैनिक संघटना राज्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना भेट देत मदतीचा हात पुढे करत आहेत.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here