राजकीय पक्ष हा मतदारांपर्यन्त पोहचण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात, निवडणूक जिंकण्यासाठी जिल्हाप्रमुख ते शाखा प्रमुखपर्यन्त सर्व तयारीनिशी मैदानात उतरत असतात , 2022 तसे निवडणुकांचे वर्ष अर्थातच आता सर्वच राजकीय नेते आप-आपल्या पक्षाचा प्रचार करण्यास मैदानात आपल्या फौजेसह उतरणार. भाजप पक्ष देखील विशेष रणीनीती आखत असून निवडणुकीत उतरला आहे.
या वर्षात ५ राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, तशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. त्यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर व पंजाब या राज्यांचा समावेश आहे. या पाच राज्यांपैकी फक्त पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे तर उर्वरित चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजप मैदानात आहे.
वेगवेगळ्या युक्त्या राबवत भाजपच्या निवडणुक आराखड्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे पन्नाप्रमुख. तुम्ही म्हणाल हे काय सांगताय पण खर आहे हे, असं म्हणलं जातंय कि, आत्ताच्या २०२२ च्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळवून देण्यात पन्नाप्रमुख सर्वात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पन्ना प्रमुखाने कंबर कसली आहे.
होऊ घातलेल्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचे नेतेही विविध राज्यांतील पन्नाप्रमुखांच्या बैठका घेत आहेत. भाजपच्या निवडणुक रणनीतीसाठी पन्ना प्रमुख महत्त्वाचा घटक आहे. मतदारांशी बोलण्यापासून ते मतदानाच्या दिवशी मतदार मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतील याची खात्री करण्यापर्यंत ते काम यशस्वी करतात. यामुळे मतदानाची टक्केवारी देखील वाढत असते, व पक्षाचे विचार देखील पोहचवणे सोपं असत.
उत्तर प्रदेशातील 2022 च्या विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी भाजप ‘मैं हूं पन्ना प्रमुख’ मोहीम राबवत आहे. उत्तर प्रदेशमध्ये पन्नास लाख पन्ना प्रमुख तयार करण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचाही उद्देश त्यामागे आहे.
पन्नाप्रमुख म्हणजे एक कार्यकर्ता असतो, त्याच्याकडे मतदार यादीच्या एका पानाच्या ३० मतदारांची जबाबदारी असते. तो मतदार यादीच्या एका पानाचा प्रमुख आहे. म्हणून त्याला पन्नाप्रमुख म्हणले जाते. भाजप आपल्या कार्यकर्त्यांना पन्ना प्रमुख बनवते. पन्ना प्रमुख यांची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या ३० मतदारांशी बोलून त्यांच्याशी संपर्क साधून सर्वांनी मतदान भाजपच्या बाजूने करावे जेणेकरून विजयश्री खेचून आणणे सोपे होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम