द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बाळा नांदगावकर यांनी मुंबईत ही माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर पूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल. धमकी ज्या पत्रामधून देण्यात आली आहे त्यामध्ये काही उर्दू शब्दांचा वापर करण्यात आले असल्याचं नांदगावकर यांनी सांगितलं आहे. राज्य आणि केंद्र सरकारने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली
आज सकाळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट बाळा नांदगावकर यांनी घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांच्यात नेमकी काय चर्चा होणार होती याची माहिती देण्यात आली नव्हती. या भेटीनंतर बाळा नांदगावकरांनी राज ठाकरेंची भेट घेतली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या भेटीमागील कारण त्यांनी स्पष्ट केलं आणि राज ठाकरेंना धमकी मिळाली असल्याची माहिती दिली.
“मला अजून एक धमकीचं पत्र आले असून . भोंग्याचा विषयास सुरुवात झाल्यापासून अशा प्रकारच्या धमक्या नेहमीच मिळत आहेत. पत्रात माझ्यासोबतच राज साहेबांना जीवे मारण्याची धमकी दिलीय. मी स्वतः साहेबांना पत्र दाखवलं तसेच संध्याकाळी पोलीस आयुक्तांना भेटलो. पत्राची प्रत त्यांना देखील दिली आहे. पोलीस काय कारवाई करतात ते पाहू,” असे नांदगावकर यांनी सांगितलं.
‘अजान बाबत जे करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करू तसेच तुम्हाला तर सोडणार नाहीच पण राज ठाकरेंनाही मारुन टाकू’ असं पत्रात लिहण्यात आल्याची माहिती नांदगावकरांनी यावेळी दिली. धमकीच पत्र हे हिंदी मधील असून त्यात उर्दू शब्दही आहेत अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले की, “पत्र कोणाकडून पाठवण्यात आले आहे याची माहिती नाही. पण ते पोस्टातून माझ्या कार्यालयात आलं आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली. नांदगावकर बोलतांना म्हणाले की, मी एवढंच सांगतो की, बाळा नांदगावकर ठीक आहे पण राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेट घेईल, राज्य पेटल्याशिवाय राहणार नाही याची दखल राज्य सरकारने घ्यावी. मी वेळोवेळी राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागत आहे. राज्य सरकार दखल घेत नाही, किमान केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी असे म्हणत नांदगावकर यांनी चिंता व्यक्त केली
“भोंग्याचा विषय धार्मिक नव्हे तर सामाजिक आहे. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशातील लोकांना याचा त्रास होत असून सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे, असं नांदगावकर म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम