पंतप्रधानांच्या बूस्टर डोस सह इतर महत्वपूर्ण घोषणा

0
57

द पॉईंट नाऊ ब्युरो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशाला संबोधित केले. ज्यात त्यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

आता देशात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. नवीन वर्षात 3 जानेवारी पासून हे लसीकरण सुरू केले जाणार आहे.

तसेच देशातील 10 जानेवारी 2022 पासून आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा बूस्टर डोस दिला जाणार आहे. तसेच 60 वर्ष वयापुढील नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस दिला जाणार आहे.

देशात जवळपास 130 कोटी लसीकरण पूर्ण झालेले आहे. मात्र सध्या जगभरात कोरोनाच्या ओमीक्रॉन या प्रकाराने धुमाकूळ घातला आहे. भारतात देखील ओमीक्रॉनचे सुमारे 400 रुग्ण आत्तापर्यंत आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.

त्याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधत या महत्वपूर्ण घोषणा आज केल्या. तसेच पंतप्रधानांनी देशवासियांना काळजी घेण्याचे देखील आवाहन केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here