द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; येथील सुराणा पतसंस्था व स्वरधारा संगीत विद्यालय आयोजित पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रविवारी (दि १७).रोजी सायंकाळी ६ वाजता सुराणा पतसंस्थेच्या हॉल मध्ये विरासंत की महिमा या अनोख्या सुश्राव्य मैफिलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी वर्ष २०२१-२२ विरासत की महीमा जगातील सर्वात जुनी मानली जाणारी संगीत परंपरा म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीत या संगीत परंपरेत अनेक घराण्यांचे मोलाचे योगदान आहे या परंपरेचे मेरुमणी असलेले किराणा घराणे हे अतिशय लोकप्रिय व सर्वश्रुत आहे .
उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब यांनी सुरू केलेल्या किराणा घराण्याचा वारसा पुढे सवाईगंधर्व व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी चालू ठेवला याच घराण्याचा वारसा पुढे चालू ठेवण्याचे काम माननीय पं . संजय गरुड हे गेली तीस वर्षांपासून अविरतपणे करत आहे विरासंत की महिमा या अनोख्या मैफिलीत पं.भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेली भक्ती गीते , भाव गीते , नाट्यचित्रगीते व शास्त्रीय ठुमरी इ सादरीकरण महान तपस्वी किराणा घराण्याचे गायक पं संजय गरुड हे करणार आहेत .
अश्या या अनोख्या मैफिलीचा कार्यक्रम रविवार (दिनांक १७) रोजी येथील सुराणा पतसंस्थेत सायंकाळी 6:00 वाजता आयोजित करण्यात आला आहे .तरी या सुश्राव्य मैफिलीच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र संगीत शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा अश्विन पाटील ,सुराणा पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ रमणलाल सुराणा यांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम