पंचायत राज समितीचा देवळा तालुका दौरा ; प्रशासकीय यंत्रणेची धावपळ

0
47
तालुक्याला भेट देणाऱ्या विधिमंडळाच्या पंचायत राज समितीस देवळा पंचायत समिती कार्यालय संदर्भात निवेदन देतांना सभापती शांताबाई पवार, उपसभापती धर्माअण्णा देवरे व इतर

सोमनाथ जगताप
देवळा प्रतिनिधी : विधिमंडळाच्या पंचायत राज समितीने शुक्रवार (दि.२७) रोजी देवळा तालुक्याला भेट दिली. या दौऱ्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. लोहोणेर येथील रस्ते कॉंक्रीटीकरण, घरकुल योजना, आदिवासी वस्ती नळपाणीपुरवठा योजना आदी कामांची पाहणी केली. आदिवासी वस्तीमध्ये झालेल्या रमाई घरकुल योजनेच्या काही बांधकामांबाबत त्रुटींवर बोट ठेवले. तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोरील तीन वर्षांपूर्वी झालेल्या रस्ता कॉंक्रीटीकरणाच्या कामाची तपासणी केली असता रस्ता उखडल्याचे दिसून आल्याने नाराजी व्यक्त केली.

तालुक्याला भेट देणाऱ्या विधिमंडळाच्या पंचायत राज समितीस देवळा पंचायत समिती कार्यालय संदर्भात निवेदन देतांना सभापती शांताबाई पवार, उपसभापती धर्माअण्णा देवरे व इतर

यानंतर देवळा पंचायत समितीच्या सभागृहात समिती सदस्यांनी विभाग निहाय आढावा घेतला. यात प्रामुख्याने घरकुल योजना ,पोषण आहार संदर्भात माहिती जाणून घेतली. या पथकात आमदार प्रशांत बंब, आमदार अंबादास दानवे, आमदार रत्नाकर गुट्टे, विधिमंडळ अधिकारी तथा उप मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक चाटे, प्रतीवेदक गजानन बोरले, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष मांडगे, कृषी अधिकारी प्रशांत पवार, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक , विस्ताराधिकारी जयवंत भामरे आदिंसह खाते प्रमुख उपस्थित होते.

आढावा बैठक संपल्यावर पंचायत समितीच्या सभापती शांताबाई पवार व उपसभापती धर्माअण्णा देवरे यांनी पंचायत राज समितीकडे देवळा पंचायत समिती कार्यालय बांधकामासाठी निधी मिळण्याबाबत निवेदन दिले. देवळा तालुका निर्मिती होवून वीस वर्षे झाली तरी पंचायत समिती कार्यालयासाठी नवीन इमारत नाही. पंचायत समितीची सर्व कार्यालये विखुरलेली आहेत. यामुळे तालुक्यातील जनतेला अडचणी येतात व कामकाजासाठी चकरा माराव्या लागतात. या पार्श्वभूमीवर अद्यावत पंचायत समिती कार्यालय उभारणीसाठी निधी मिळणेबाबत प्रयत्न व्हावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here