द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : आर्थिक जीवन जगण्यासाठी नोकरी ही प्रत्येकाला करण गरजेचं असत परंतु नोकरी करताना काही वेळेस नोकरी बदलली जाते. आणि या बदललेल्या नोकरीमुळे पीएफ खात्यातही बदल करावे लागत होते.
मात्र अशा वेळी सर्वांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे आपला भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी आता त्रास करून घ्यावा लागणार नाही. कारण आता पीएफ खात्याची सेंट्रलाइज सिस्टम सुरु करण्यात येणार आहे .
त्याच्या साठी लवकरच मंजुरी देण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत झाला आहे. सेंट्रलाइज सिस्टम मुळे पीएफ खात ट्रान्स्फर करण्याचा व्याप आता करावा लागणार नाही.
सेंट्रलाइज सिस्टीमच्या माध्यमातून संबंधित कर्मचाऱ्यांचा जूना पीएफ खात आता नव्या खात्यात आपोआप विलनीकृत होईल. सध्या तशी व्यवस्था नाही आहे परंतु एखादी कंपनी सोडली किंवा दुसरी नोकरी स्वीकारली तर त्यासाठी नविन खात उघडलं जात किंवा जुन्या खात्याची रक्कम ट्रान्सफर केली जाते
आणि अशी उपचारिक्ता पार पाडण्यास बराच वेळ जातो. मात्र आता पीएफ खात्याच्या सेंट्रलाइज सिस्टम मुळे वेळ आणि काम सोप्या पद्धतीने होणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम