नोकरी नाही म्हणून लग्न नाही; तणावाखाली तरुणाची आत्महत्या

0
24

द पॉईंट नाऊ ब्युरो : आज मोठे शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळण्याबाबत काहीही खात्री राहिलेली नाही. त्यात नोकरी नसेल तर लग्न होणेही अवघड आहे. याच कारणातून औरंगाबाद (संभाजीनगर) जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर गावाच्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिऊर येथील त्रिभुवन या तरुणाने घराची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतांना देखील पदवी पर्यंत शिक्षण घेतले. परंतु, त्याचे हे शिक्षण देखील त्याला नोकरी मिळवुन देऊ शकले नाही. नोकरी नाही म्हणून त्याचे लग्न ही जमत नव्हते. याच कारणातून त्रिभुवन ने आपले जीवन संपवले.

नोकरी आणि लग्न या दोन्ही गोष्टी नसल्यामुळे त्रिभुवन तणावाखाली होता. याच तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलले.

आजकाल नोकरी मिळण्यासाठी तरुणाई शिक्षणाकडे मोठ्या जिद्दीने वळत आहे. मात्र त्यांचे शिक्षण त्यांना नोकरी मिळवून देऊ शकत नाही. यामुळे अनेक तरुण वाममार्गाला देखील लागल्याचे दिसून येते. हलाखीच्या परिस्थितीतुन आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या त्रिभुवनला नोकरी न मिळाल्याने आणि लग्न होत नसल्याने त्याने जीवन संपवले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here