नेत्रजा हिरेची नवोदय विद्यालयासाठी निवड

0
38

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नुकत्याच झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय पात्रता परीक्षेत उमराणे येथील नेत्रजा रत्नाकर हिरे हिने यश मिळवले. पात्रता परीक्षेचा निकाल परवाच जाहीर झाला . त्यात नेत्रजाची जवाहर नवोदय विद्यालय खेडगाव नाशिक येथे निवड झाली.
नेत्रजा छत्रपती शिवाजी मराठा स्कूल उमराणे या शाळेची विद्यार्थ्यांनी आहे .

नेत्रजाला मुख्याध्यापक पी के सूर्यवंशी, नवोदय क्लासेसचे संचालक एच एस देवरे, संदीप हिरे,श्रीमती सविता हिरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले .नेत्रजा जिल्हा बँकेचे देवळा येथील विभागीय अधिकारी रत्नाकर हिरे यांची कन्या आहे .

तिच्या या यशाबद्दल आमदार डॉ. राहुल आहेर , जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा नाना आहेर, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, आदींनी तीचे अभिनंदन केले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here