निवडणुकीत यश ; कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांचा सत्कार

0
181
देवळा -कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांचा सत्कार करताना पंडितराव निकम ,बाळासाहेब निकम,धनाजी निकम आदी

देवळा प्रतिनिधी : कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी पुनश्च एकदा कारखान्यात विजश्री प्राप्त केल्याबद्दल देवळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते पंडितराव निकम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शेटे यांचा सत्कार केला.

देवळा -कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांचा सत्कार करताना पंडितराव निकम ,बाळासाहेब निकम,धनाजी निकम आदी

जिल्हयात सहकार क्षेत्रात एकमेव कादवा साखर कारखाना सुस्थितीत सुरू आहे . या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली . विद्यमान अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी अंत्यत काटकसरीपणा व ऊस उत्पादकांनाचा विश्वास संपादन केला आहे .

यामुळे पुन्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शेटे यांच्या कादवा विकास पॅनलकडे पुनश्च एकदा सत्ता दिली .या यशाबद्दल शेटे यांचा देवळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते पंडितराव निकम यांच्यासह माजी सभापती बाळासाहेब निकम , धनाजी निकम ,महेंद्र आहेर, संजय सावळे आदींनी भेट घेऊन सत्कार केला .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here