निवडणुकीचे चित्र ‘दादांच्या’ सभेने पालटले ; ‘नानांच्या’ रॅलीने भाजपात प्रचंड आत्मविश्वास

0
71

द पॉईंट नाऊ ब्युरो : देवळा नगरपंचायत निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात नेत्यांनी जोर लावत झंझावाती दौरे केले. भाजपाच्या बाजूला एकतर्फी झालेली निवडणूक शेवटच्या क्षणी उदयकुमारांच्या सभेने वातावरण पालटून टाकले, सभेचा थेट फायदा हा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना होईल अशी चर्चा आज दिवसभर मतदारांमध्ये होती.

भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी झंझावात दाखवून दोन वॉर्ड बिनविरोध केले तर सेनेचे शहराध्यक्ष आपल्या ताब्यात घेत विरोधकांच्या एकजुटीची हवा काढत, विरोधी नेत्यांची दाणादाण उडवली, शहरात आता फक्त भाजपाच अस चित्र असतांना, राष्ट्रवादीने आपला प्रचार नेटाने पुढे नेला , अन मतदानाच्या दोन दिवस आधी उदयकुमारांच्या सभेत अक्षरशः भाजप नेतृत्वाचे कपडे त्यांनी काढले अन राजकारणात केदा आहेरांना कुणीतरी अंगावर घेऊ शकतो, याचा विश्वास नागरिकांना आला यामुळे लोकांच्या बोलण्यात कमालीचा बदल झाला, त्यातच भाजपाने उमेदवार देतांना मोठे राजकारण खेळले त्याचा फटका देखील भाजपाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नानांनी उदयकुमारांच्या कुठल्याच आरोपांना उत्तर न दिल्याने नागरिकांमध्ये मात्र कमालीची चर्चा झाली. नानांनी नेहमी प्रमाणे उत्तर न देता विरोधकांना नामोहरम करू असा प्लॅन आखला असावा मात्र हा टाईम चुकला अन उत्तर न देणे किंवा आरोपांचे खंडन न केल्याने उलटसुलट चर्चा सर्वत्र सुरू आहेत. यावेळी नानांची ही पद्धत अंगलट येण्याची शक्यता बळावली आहे. जाहीर सभेत केलेल्या आरोपांना उत्तर देणे गरजेचे होत मात्र ते झालं नाही. सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. 15 ते 20 भोंग्यांच्या माध्यमातून संपूर्ण शहराला ही सभा एकता आली व त्याचा परिणाम चर्चेतून दिसून आला आहे.

भाजपाच्या नेत्यांना नाना हे काही करून सत्ता आणतील जनता विकासाच्या मुद्द्यावर भाजपाला साथ देईल हा आत्मविश्वास लढण्यासाठी मदत करत आहे, विरोधकांपेक्षा भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास अफाट आहे. शेवटच्या दिवशी नानांनी स्वतः रॅली घेत मतदारांच्या भेटी घेतल्याने कार्यकर्त्यांसह उमेदवारांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here