निवडणुका संपल्या की राजकीय मतभेद बाजूला सारून विकासात्मक दृष्टिकोन हवा

0
10

येवला प्रतिनिधी : केंद्रीय मार्ग निधी व प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत निफाड तालुक्यासह येवला व लासलगाव मंडळात मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन सोमवार दि.14 रोजी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्ते कामांना मंजुरी मिळावी याकरिता स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांचे कडून मोठ्या प्रमाणात मागणी होत होती. या मागणीला दाद देत डॉ. पवार यांनी विकास कामे मंजूर करून आणले.

रस्त्यांची दुरवस्था झाल्याने दळणवळण करणे देखील जिकिरीचे झाले असता ह्याबाबत ना.डॉ.पवार यांनी गंभीर दखल घेत रस्ते कामांचा दिल्ली येथे पाठपुरावा करून मंजूर करून आणले असून त्या रस्ते कामांचे सोमवारी दि.14 रोजी ना.डॉ.भारती पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. ह्या रस्ते कामांमुळे तालुक्यासह परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

मा.ना.डॉ.भारती प्रवीण पवार, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, भारत सरकार यांच्या प्रयत्नातुन दात्याने, जिव्हाळे ते शिरसगाव रस्ता ( किमी ६.२००) ची सुधारणा व देखभाल दुरुस्ती करणे.
निफाड (रक्कम ४१४.१९ लक्ष),. नैताळे ते रामपूर कोळवाडी, सोनेवाडी बु. ते प्रजीमा-६४ निफाड रस्ता (किमी ३.८००) ची सुधारणा करणे ता. निफाड (रक्कम २५७.२९ लक्ष) ,
प्रजीमा-२७ (भूसे) ते म्हाळसाकोरे, तारुखेडले रस्ता (किमी ३.३००) ची सुधारणा व देखभाल दुरुस्ती करणे ता. निफाड ( रक्कम २१४.७५ लक्ष) , नांदूर मधमेश्वर ते धारणगाव खडक – बोकडदरे रस्ता (किमी ५.३२०) ची सुधारणा व देखभाल दुरुस्ती करणे.
ता. निफाड ( रक्कम ३३५.९० लक्ष) , केंद्रीय मार्ग निधी (CRIF) योजना अंतर्गत मंजूर कानळद ते देवगाव प्रजीमा २६१ रस्ता ते भरवस फाटा ची सुधारणा करणे (किमी १४.२००) ता. निफाड ( रक्कम ७१२.६९ लक्ष) झाली आहे.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिति सदस्य, सर्व गावांचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटी चेअरमन व सदस्य उपस्थित होते, तसेच कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर, निफाडचे तालुकाध्यक्ष भागवतबाबा बोरस्ते, लासलगाव मंडल भाजपा अध्यक्ष डी.के.नाना जगताप उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here