
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; निर्वाण फाउंडेशन आयोजित सन – २०२१ चा इंटरनॅशनल आयडाॕल अवार्ड व तसेच ऑडियन्स मधून संपूर्ण भारतातून सर्वाधिक 2000 लाईक मिळवून ऑडियन्स चॉईस अवॉर्ड कलाशिक्षक, चित्रकार भारत पवार,देवळा एज्युकेशन सोसायटी, यांना नाशिक येथे आदित्यहॉल मध्ये दिमाखदार सोहळ्यात मिस इंडिया इंटरनॅशनल युनिवर्स क्विन शिल्पी अवस्थी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

समवेत आफ्रिकन स्काॕलर सोशल अँक्टीव्हिटि सनासी बायडम,निर्वाण फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश आंबेडकर ,सामाजिक कार्यकर्त्या आरती हिरे,सौ.विमलताई बोधरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याबद्दल पवार यांचे देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्राचार्य हितेंद्र आहेर,सचिव गंगाधरमामा शिरसाठ,उपप्राचार्या डॉ.मालती आहेर ,माध्यमिक शिक्षणाधिकारी पुष्पावती पाटील , गटशिक्षणाधिकारी ,सतीश बच्छाव ,केंद्रप्रमुख रावबा मोरे,मुख्याध्यापिका प्रतिभा सागर ,मुख्याध्यापक .डी.ई.आहेर ,पर्यवेक्षक ठोके सर सर्व शिक्षक -शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम