प्रसाद बैरागी
निफाड/प्रतिनिधी : निफाड येथे तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. सद्यस्थितीत या इमारतीच्या आवारात नदीकाठालगत संरक्षक भिंत बांधणे, परिसरातील रस्ते काँक्रिटीकरण करणे, वाहनतळ बांधणे, फर्निचर व कोर्ट यार्ड बांधकाम करणे आदी कामे करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर सदर कामांना प्रशासकीय मान्यता मिळवून तब्बल ४ कोटी १३ लाख रुपयांचा निधी द्यावा म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीस यश आले असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना आमदार बनकर म्हणाले, वरील सर्व कामांचा ४ कोटी १३ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागास सादर करण्यात आला होता. सदरच्या प्रस्तावास नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली असून याकामी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम