निफाड पंचायत समिती उपसभापती पदी सोनाली चारोस्कर बिनविरोध

0
47

प्रसाद बैरागी
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; निफाड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी माजी आमदार अनिल कदम यांच्या निर्देशाने सायखेडा गणाच्या शिवसेनेच्या सदस्या सोनाली बाळासाहेब चारोस्कर(वाघले) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

गयाबाई सुपनर यांनी आवर्तनानुसार (रोटेशन) राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदावर त्यांची निवड करण्यात आली. पंचायत समिती सभागृहात तहसीलदार शरद घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली व बीडीओ संदीप कराड, रमेश शेळके यांच्या उपस्थितीत सदस्यांची निवडीसाठी विशेष बैठक झाली. सोनाली चारोस्कर यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून पंडित आहेर यांनी स्वाक्षरी केली.

त्यांचा एकमेव अर्ज आल्याने तहसीलदार घोरपडे यांनी चारोस्कर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी निवड सभेस सभापती सुलभाताई पवार, मावळत्या उपसभापती गयाबाई सुपनर, पंचायत समिती सदस्य शिवा पाटील सुरासे, राजेश पाटील, सोमनाथ पानगव्हाणे, पंडित आहेर, कमल राजोळे, रत्ना संगमनेरे, सपना बागुल, दिलीप सूर्यवंशी हे उपस्थित होते.

सोनाली चारोस्कर यांची निवड जाहीर होताच गोदाकाठच्या शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. यावेळी सोनाली चारोस्कर(वाघले) यांचा सत्कार शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड व करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सुधीर कराड, खंडू बोडके-पाटील, शिवा सुरासे, शरद कुटे यांनी मनोगत व्यक्त करत चारोस्कर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बाळासाहेब चारोस्कर, किरण वाघले, सुधीर कराड, खंडू बोडके-पाटील, नंदू पवार, शहाजी राजोळे, शंकर संगमनेरे, गोटू बागुल, सागर जाधव, शरद कुटे, शाम जोंधळे, गणेश कातकाडे, सागर बोडके, भाऊ घुमरे, गणेश वाणी, सुदाम खालकर आदींसह गोदाकाठचे शिवसैनिक उपस्थित होते. सुत्रसंचालन खंडू बोडके-पाटील यांनी केले. निवडीनंतर चारोस्कर यांनी उपसभापतीपदाची सूत्रे स्वीकारली.

गोदाकाठचा सन्मान :- खंडू बोडके-पाटील

माजी आमदार अनिल कदम यांच्या निर्देशाने आज पंचायत समितीच्या उपसभापती सोनालीताई बाळासाहेब चारोस्कर यांची निवड झाल्याने गोदाकाठचा सन्मान माजी आमदार अनिल कदम यांनी केला आहे. सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी चारोस्कर यांची निवड सार्थकी लागेल.
खंडू बोडके-पाटील
(मा.सरपंच करंजगाव)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here