निफाड नगरपंचायत निवडणूकीसाठी ३९ उमेदवारी अर्ज दाखल

0
11

प्रसाद बैरागी
निफाड प्रतिनिधी : निफाड नगरपंचायत निवडणूक १७ प्रभागासाठी ३९ उमेदवारांचे अर्ज दाखल. नगरपंचायत निफाड चा नगरसेवक कार्यकाळ पाच वर्ष पूर्ण होऊन वरती अकरा महिने झाल्यानंतर निफाड नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला व त्यानुसार आज नगरपंचायत कार्यक्षेत्रात उमेदवार व नेत्यांची लगीनघाई जोरात सुरू झाली.

भावी व विद्यमान नगरसेवक आपापल्या प्रभागात उमेदवारी करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी आता धावपळ करतांना दिसत आहे. निफाड नगरपंचायत निवडणूकीसाठी आज पर्यंत ३९ अर्ज दाखल करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी पक्षाचे अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून काही अपक्ष उमेदवारांनी हि अर्ज दाखल केले आहे. दिनांक ७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here