निफाड नगरपंचायत निवडणूकित शिवसेना व शहर विकास आघाडीचा भगवा

0
38

प्रसाद बैरागी
निफाड वार्ताहर : निफाड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतमध्ये शिवसेना व शहर विकास आघाडीने 17 पैकी 14 जागावर विजय मिळवून निफाडचे माजी आमदार अनिल पाटील कदम, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार आणि अनिल पाटील कुंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि निफाड शहर विकास आघाडीचा भगवा फडकला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त तीनच उमेदवार विजयी झाल्याने विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना जोरदार धक्का बसला आहे. शिवसेनेच्या चिन्हावर सात उमेदवार विजयी झाले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी, उद्धव साहेब आगे बढो, अनिल कदम आगे बढो अश्या जयघोषात फटाके वाजवून गुलाल उधळत जल्लोष साजरा केला. शांतीनगर येथे विजयी सभेत माजी आमदार अनिल कदम, राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे, तालुकाप्रमुख सुधीर कराड, अभिजित चोरडिया, खंडू बोडके पाटील यांनी भाषण करत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांच्या पत्नी रुपाली रंधवे यांनी वार्ड 13 मध्ये लक्षवेधी लढतीत विजय मिळवला.

निफाड नगर पंचायत विजयी उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे
प्रभाग १ : अरूंधती पवार (बसपा)
प्रभाग २ : किशोर ढेपले (अपक्ष)
प्रभाग ३ : अनिल कुंदे (शिवसेना),
प्रभाग ४ : शारदा नंदू कापसे (शिवसेना)
प्रभाग ५ : पल्लवी जंगम (काँग्रेस)
प्रभाग ६ : साहेबराव बर्डे (श वि आघाडी )
प्रभाग ७ : विमल जाधव (शिवसेना),
प्रभाग ८ : सुलोचना धारराव (शिवसेना),
प्रभाग ९ : सागर कुंदे (राष्ट्रवादी काँग्रेस),
प्रभाग १० : डॅा. कविता धारराव (शिवसेना),
प्रभाग ११ : संदीप जेऊघाले (शिवसेना),
प्रभाग १२ : रत्नमाला कापसे (शिवसेना)
प्रभाग 13 : रूपाली विक्रम रंधवे शिवसेना
प्रभाग 14 : जावेद शेख राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग 15 : किरण कापसे राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग 16 : कांताबाई कर्डिले शहर विकास आघाडी
प्रभाग 17 : अलका निकम शहर विकास आघाडी

यावेळी विजयी सभेत शिवसेना व शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निफाड नगरपंचायतीवर अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली भगवा फडकल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करताना विजयी उमेदवार.

निफाड नगरपंचायतीचा प्रभाग निहाय निकाल पुढीलप्रमाणे
प्रभाग 1- अरुंधती पवार- बसपा, – 454 विजयी
सचिन खडताळे – कॉग्रेस ,233 पराभूत
विजय झोटिंग -राष्ट्रवादी कॉग्रेस -9.
स्वप्नील आहेर – अपक्ष- 216

प्रभाग 2 – किशोर ढेपले – अपक्ष, -533 विजयी
सचिन धारराव- भाजपा, 337 पराभूत
दिनेश कापसे–कॉग्रेस, -12

प्रभाग क्रमांक 3- अनिल रंगनाथ कुंदे – शिवसेना – 661 विजयी
गोपाळ साहेबराव कापसे – राष्ट्रवादी कॉग्रेस -430 पराभूत
प्रभाग 4- शारदा कापसे – निफाड शहर विकास आघाडी- 578 विजयी
आसिया शेख – राष्ट्रवादी कॉग्रेस ,- 459 पराभूत
धोंडयाबाई वाळुंज- भाजपा -15

प्रभाग 5- पल्लवी जंगम – कॉग्रेस – 658 विजयी
चंद्रकला गायकवाड – अपक्ष – 37 पराभूत
स्मिता बिवाल- भाजपा – 32

प्रभाग 6 – साहेबराव बर्डे – निफाड शहर विकासआघाडी, विजयी – 424 विजयी
अशोक पवार – राष्ट्रवादी कॉग्रेस -51 पराभूत
सुभाष भगरे – भाजपा, -49

प्रभाग 7-
विमल जाधव- शिवसेना-305 विजयी
लता मोरे -राष्ट्रवादी कॉग्रेस -190 पराभूत
लक्ष्मी पवार -भाजपा-31

प्रभाग 8 –
सुलोचना होळकर-शिवसेना, 321 विजयी
-माया धारराव -राष्ट्रवादी कॉग्रेस – 220 पराभूत
मनिषा खैरनार -भाजपा, -63

प्रभाग 9 –
सागर कुंदे -राष्ट्रवादी कॉग्रेस – 335 विजयी
संजय कुंदे – शिवसेना – 275 पराभूत

प्रभाग क्रमांक 10-
कविता नितिन धारराव – शिवसेना- 407 विजयी
सिंधू बापू कुंदे – राष्ट्रवादी कॉग्रेस – 304 पराभूत

प्रभाग 11-

संदीप जेऊघाले-शिवसेना -,362 विजयी
दिलीप कापसे- राष्ट्रवादी कॉग्रेस – 338 पराभूत
दीपक कुंदे – कॉग्रेस, -86
मयूर कापसे -भाजपा, -23
संदीप शिंदे-अपक्ष -3

प्रभाग 12 –
रत्नमाला कापसे -शिवसेना- 587 विजयी
, वर्षा गाजरे- अपक्ष – 207 पराभूत

प्रभाग क्रमांक 13 –
रुपाली विक्रम रंधवे – शिवसेना – 502 विजयी
स्वाती बाळासाहेब गाजरे, राष्ट्रवादी कॉग्रेस -177 पराभूत

प्रभाग 14 –
जावेद शेख – राष्ट्रवादी कॉग्रेस- 372 विजयी
वैभव कापसे – भाजपा- 273 पराभूत
अरिफउद्दीन मणियार – शिवसेना,-
159

प्रभाग 15 –
किरण कापसे – राष्ट्रवादी कॉग्रेस – 306 विजयी
सुनील निकाळे – कॉग्रेस-293 पराभूत
किशोर जावरे -भाजपा- 138
अकिबखान पठाण- बसपा- 3

प्रभाग 16
कांताबाई कर्डिले – निफाड शहर विकास आघाडी,
-464 विजयी
जिजाबाई कापसे -राष्ट्रवादी कॉग्रेस – 263 पराभूत

प्रभाग 17 –
अलका निकम – निफाड शहर विकास आघाडी -258 विजयी
सुयशा बिवाल- भाजपा – 148 पराभूत
सुयशा बिवाल- भाजपा – 148 पराभूत
सुनीता पवार – राष्ट्रवादी कॉग्रेस,-125

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here