निफाडला प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रहारने सैनीकांचा केला सन्मान

0
41

प्रसाद बैरागी
निफाङ प्रतिनिधी : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शालेय शिक्षण व महीला बालकल्याण राज्यमंञी तथा प्रहार पक्षाचे संस्थापक ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कङु यांच्या संकल्पनेतुन प्रहार जनशक्ति पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सागर निकाळे यांच्या वतीने
निफाड पोलीस स्टेशनचे कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकारी तसेच सीमेवर आपल्या जीवाची पर्वा न करता देशासाठी लढणाल्या जवानांचा शाल, सन्मानपञ, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

लोकशाही यशस्वी करण्यासाठी इथल्या प्रत्येक नागरिकाचा हातभार लागत असतो परंतु लोकशाहीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था ह्यांचा सगळा भार पोलिस दल तसेच भारतीय लष्कर सांभाळतं. माणसाला न्याय भेटला नाही तर त्याच वेळेस तो तात्काळ पोलिस स्टेशन गाठतो तसेच देशाच्या नागरिकांचे संरक्षणासाठी प्रत्येक जवान आपले प्राण तळहातावर घेऊन आपले कर्तव्य पार पाडतो हि सगळी प्रक्रिया बघितली तर लोकशाही ख-या अर्थाने यशस्वी करण्याचे काम कर्तव्यनिष्ठ आधिकारी तसेच जवानांच्या माध्यमातून घडत असते म्हणुनच प्रजासत्ताक दिनी त्यांचा सन्मान होणे महत्त्वाचे आहे ह्या भुमिकेतुन हा सन्मान करण्यात आल्याचे उपजिल्हाप्रमुख सागर निकाळे यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले याप्रसंगी प्रांताधिकारी ङाँ.अर्चना पठारे, पोलीस निरीक्षक आर.बी.सानप, प्रहारचे तालुका अध्यक्ष दिगंबर वङघुले, उपाध्यक्ष राहुल सोनवने, तालुका संघटक ज्ञानेश्वर सांगळे, उपशहरअध्यक्ष शेरखान मुलानी, ता.साचिव अरुण थोरे, राहुल जमधाङे, अमोल शिंदे दिनेश काऊतकर, अमोल शिंदे, मनोज जगदाळे, सिध्दार्थ खङताळे आदी पदाधिकारी उपस्थितीत होते


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here