निफाडच्या राजकारणात ‘आण्णा’ वरचढ ; ‘काका’ बॅकफूटवर

0
29

निफाड प्रतिनिधी : निफाड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांनी शहर विकास आघाडीचे राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे यांना सोबत घेत बांधलेली मोट यशस्वी ठरली अन, निफाड नगरपंचायतीवर भगवा फडकला. विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसला तीनच जागा मिळाल्यात त्यात दोघे विजयी उमेदवार पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. यामुळे अनिल कदम यांचे राजकारण संपले अस म्हणणाऱ्यांना ही सणसणीत चपराक आहे. कदमांनी कृतीतून सर्व्यांनाच इशारा दिला आहे.

निफाड नगरपंचायतीत गेल्यावेळी भाजप आणि शिवसेना प्रत्येकी पाच, राष्ट्रवादीचे ४, काँग्रेस, बसपा अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल होते. या निवडणुकीसाठी 43 उमेदवार रिंगणात होते. महाविकास आघाडीचे सरकार असल्याने स्थानिक पातळीवर देखील आघाडी होईल असे अंदाज खोटे ठरलेत, निफाड मध्ये कदम बनकर यांच्या राजकारणात तरुणाई दुभंगली आहे.

माजी आमदार अनिल कदम यांनी पहिल्यापासूनच संयमी भूमिका घेत शिवसेना, शहर विकास आघाडी आणि मित्र पक्षांना सोबत घेऊन राजाभाऊ शेलार आणि अनिल कुंदे यांनी यशस्वी नियोजन केले. व दणदणीत विजय घडवून आणला.

कदम यांनी निफाड नगरपंचायतीवर एक हाती सत्ता आणली तर दुसरीकडे विधानसभेत मिळालेल्या यशाच्या जोरावर निफाड नगरपंचायतीचे सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. व यातील दोन सेनेचे उमेदवार असल्याने विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना निफाड शहरात विधानसभेला भरघोस मते मिळाली होती, मात्र नगरपंचायत निवडणुकीत दिलीप बनकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नागरिकांनी नाकारले आहे. आमदार दिलीप बनकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, याउलट शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांनी शहर विकास आघाडीचे राजाभाऊ शेलार यांना सोबत घेऊन बेरजेचे राजकारण करीत शिवसेनेचा भगवा निफाड नगरपंचयातवर फडकून टायगर अभी जिंदा है असा इशारा दिला आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here