द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक डिस्ट्रिक्ट प्रायमरी टीचर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटी, येवला लि. नाशिक या आर्थिक संस्थेच्या अध्यक्षपदी नंदकुमार गांगुर्डे तर उपाध्यक्षपदी गोवर्धन खंबाईत यांची बुधवार (दि.८) रोजी बिनविरोध निवड झाली. मावळते चेअरमन चंद्रशेखर धाबळे व व्हा.चेअरमन सरला आहेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही दोन्ही पदे रिक्त झाली होती.
अध्यासी अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिकचे फयाज मुलानी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष बैठक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांनीच काम पाहिले. या निवडीप्रसंगी चेअरमन पदासाठी नंदकुमार गांगुर्डे यांचा तर व्हा.चेअरमन पदासाठी गोवर्धन खंबाईत यांचेच अर्ज असल्याने सदर निवडीवर उपस्थित संचालक मंडळाकडून बिनविरोध व एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आल्याने त्यांची निवड घोषित करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे मावळते चेअरमन चंद्रशेखर धाबळे, सरला आहेर यांच्यासह संचालक सोमनाथ पवार, भाऊसाहेब आहिरे, दिलीप तरवारे, मनोहर भोये, उमेश बैरागी, सतीश आहेर, प्रभाकर चव्हाण, निवृत्ती तळपाडे, मोतीराम नाठे, दीपक सोनवणे, मंजुषा आहिरे, व्यवस्थापक विजय आहेर व इतर कर्मचारी उपस्थित होते.
या निवडीनंतर सर्व संघटनांचे नेते व पदाधिकारी त्यात अंबादास वाजे, मनोहर टोपले, अर्जुन ताकाटे, आनंदा कांदळकर, प्रकाश सोनवणे, सचिन कापडणीस, धनराज वाणी, बाजीराव सोनवणे, विनायक ठोंबरे, धनंजय आहेर, मिलिंद गांगुर्डे, राजेंद्र भोये, चंद्रकांत लांघी, तुकाराम भोये, संजय भोये व इतर कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हा.चेअरमन यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना चेअरमन श्री.गांगुर्डे यांनी सांगितले की, सभासद व संचालकांनी टाकलेल्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही. सर्व संचालकांना सोबत घेत संस्थेच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन.
Edit bye – Somnath Jagtap
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम