नाशिक प्रतिनिधी : जगात विश्वास हरवत चाललाय त्यात विश्वास कोणावर ठेवावा हा प्रश्न पडलाय, नाशिकमधील शरणपूर रोडवरील टिळकवाडी येथील बाफना ज्वेलर्सच्या (Bafana jewelers) दुकानातून नोकरानेच दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे सराफ व्यावसायिक कमालीचे बिथरले आहेत.
आज याप्रकरणी स्टाफ मधीक संदीप देशपांडे यांच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिसामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी, संशयित सफाई कर्मचारी मयूर बाविस्कर हा साफसफाई करण्याच्या बहाण्याने मालकांच्या कॅबीनमध्ये प्रवेश केला व सोन्याच्या आणि चांदीच्या वस्तू चोरी केल्या. विश्वास ठेवल्यानंतर अस घडत असेल तर हा भयंकर प्रकार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
या भामट्याने ११ हजार रुपये किमतीचे एक सोन्याचे मंगळसूत्र दोन वाटी व सोन्याचे चार मनी, सोन्याची तारे असलेली अडीच ग्रम वजन, ३० ग्रम वजनाचा १ हजार आठशे रुपयांचा चांदीचा ग्लास, असे एकूण ४ हजार रुपये किंमतीचे ३ जोड पायल, ६० हजार रुपये किंमतीचे एक सोन्याचे लगड, २२ हजार ५०० रुपये किंमतीची सोन्याची अंगठी व ९ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे कानातील टाप्से असे एकूण १ लाख ८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल वेळोवेळी चोरून नेला आहे. मात्र हा प्रकार उशिरा लक्षात आला.
ही बाबत जेव्हा लक्षात आली तेव्हा तात्काळ देशपांडे यांनी सरकारवाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक काकवीपुरे तपास करत आहेत. पुढील तपासात अजून काय माहिती समोर येते हे बघणे महत्त्वाचे आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम