नाशिक – धुळे बसवर उमराने येथे दगडफेक

0
199

द पॉईंट नाऊ विशेष ; नाशिक धुळे बसवर दुपारी 4 वाजता , सांगवी फाट्या नजीक उमराने येथे अज्ञातांनी दगडफेक केली आहे. बस क्रमांक MH14 BT 5066 या गाडीवर दगड फेक झाली, या संदर्भात देवळा पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक सुरेश सोळंखे व वाहक अजय बागुल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

या हल्ल्या दरम्यान गाडीत 22 प्रवासी होते, सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून सरकारने गंभीर इशारा दिल्यानंतर काही कर्मचारी कामावर हजर झालेत, यामुळे संपात उभी फूट पडली आहे, अनेक ठिकाणी दगडफेकीचे प्रकार राज्यभर घडले आहेत. त्यात आज नाशिक जिह्यातील ग्रामीण भागात हा प्रकार घडल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

राज्यातील संपाला गालबोट असाच लागत राहिल्यास प्रवाशांची चिंता मात्र वाढणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here