द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (निफाड) : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याच्या लोणवाडी परिसरात दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कुणाल गायकवाड आणि गौरव गायकवाड अशी मृत मुलांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुणाल आणि गौरव ही दोघेही मुले खेळण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली. खेळता खेळता ती शेततळ्याजवळ गेली. मात्र यात लहानगा 4 वर्षांचा कुणाल पाण्यात पडला आणि त्याला वाचवण्यासाठी 7 वर्षांचा गौरव पुढे सरसावला. मात्र यात दोघांचाही मृत्यू झाला. एकाच वेळी घरातल्या दोन लहानग्यांचा जीव गेल्याने गायकवाड परिवारावर शोककळा पसरली आहे.
याआधी चांदवड तालुक्यात देखील तळेकर परिवारातील दोन लहानग्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. आणि आता निफाड तालुक्यात घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
शेतांमध्ये पाण्याच्या कमतरतेला भरून काढण्यासाठी म्हणून शेततळे बांधले जातात. त्यामुळे घरातल्या लहानग्या मुलांकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. या शेततळ्यांना संरक्षक जाळ्या असणे आवश्यक आहे. असेच आता या घडलेल्या घटनांवरून वाटू लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम