देवळा प्रतिनिधी : नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, नाशिकच्या कार्याध्यक्षपदी देवळा मर्चंट्स को-ऑप.बँकेचे संचालक राजेंद्र नामदेवराव सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली .
ही नेमणूक श्रीमती मनिषा खैरनार अध्यासी अधिकारी तथा सहायक निबंधक (1) अधिन-जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बँक असोसिएशनच्या कार्यालयात ही निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे देमकोचे चेअरमन जयप्रकाश कोठावदे ,व्हा चेअरमन राजेंद्र वडनेरे , कार्यकारी संचालक डॉ प्रशांत निकम,संचालक सर्वश्री अनिल धामणे, केदारनाथ मेतकर, किसन मोरे,मनीषा सिनकर,अरुणा बागड, भूषण कोतकर, व्यवस्थापक गणेश ततार आदींनी अभिनंदन केले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम