द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल होते. यानंतर सर्वत्र टीकेची झोड उठली, या वक्तव्यानंतर युवा सेनेने आक्रमक होत मुंबईत नारायण राणे कोंबडी चोर असे बॅनर लावले. सध्या पोलिसांनी बॅनर हटवले असून वाद वाढण्याची चिन्हे आहेत.
युवा सैनिकांनी नारायण राणे यांना कोंबडी चोरची उपमा देऊन रात्रीत बॅनर लावले, मात्र सकाळी माध्यमात चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हे बॅनर हटवले आहेत.
दादर टी टी भागात होर्डिंग लागले होते यामुळे आज पुन्हा राणे विरुद्ध सेना संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत सेनेचे नगरसेवक, युवा सेना पदाधिकारी अमेय घोले यांनी हे होर्डिंग लावले आहेत.
कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस खबरदारी घेत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम