नाना – दादा यांचा विजयीरथ रोखण्यासाठी विरोधकांची हवी एकजूट

0
38

द पॉईंट नाऊ विशेष ; देवळा तालुक्यात भाजपा वगळता बाकी पक्षांची दाणादाण आहे. एकछत्री अंमल भाजपाचा तालुक्यात आहे. भाजपाचे आमदार राहुल आहेर व भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचा दबदबा शहरात नक्की आहे, नगर पंचायतीत सत्ता देखील गेली पंचवार्षिक त्यांचीच होती. राष्ट्रवादी काँग्रेसची तालुक्यातील परिस्थिती म्हणजे ‘एक नही एकात अन म्हणे आम्ही सत्तेच्या बेतात’ अशीच आहे. केदा नाना व राहुल दादा यांचा विजयाचा वारू रोखण्यासाठी योगेश आबा व उदय दादा या जोडगोळीने एकत्र येऊन त्यांनी सर्व विरोधकांची मोट बांधून आघाडी तयार केली तर काही अंशी शक्य आहे, त्यासाठी विरोधकांना एकत्रित येणे हाच पर्याय आहे.

राष्ट्रवादीच्या तालुक्यातील नेत्यांनी कितीही म्हटले आम्ही एकत्र आहोत एकजुटीने लढू तरी ते शक्य नाही. तालुक्यातील महत्वाचे डॅशिंग नेतृत्व अर्थात शिवसंग्राम संगटनेचे प्रदेश अध्यक्ष उदयकुमार आहेर यांच्या भूमिकेकडे सर्व्यांचे लक्ष लागून आहे. रणांगणात उदयकुमार आहेर सभा गाजवतील, लढतील मात्र त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचे जाळे व उमेदवार तयार होतील का हे बघणे महत्त्वाचे आहे, विशेष म्हणजे नगरपंचायत निवडणुकीत ते उतरणार की नाही हे बघणं गरजेचं आहे, कारण गेल्या निवडणुकीतील त्यांचा सपत्नीक झालेला पराभव धक्कादायक होता. तालुक्यात काँग्रेस ,शिवसेना व अन्य पक्षांना उमेदवार मिळणे देखील कठीण आहे.

तालुक्यातील पक्षीय स्थिती

भाजपा
गेल्या पंचवार्षिकला नगरपंचायत भाजपा प्रणित आघाडीच्या ताब्यात आहे, मात्र शहरातील अनेक समस्या जैसे थे आहेत, अंतर्गत काही वार्डात रस्ते चकचकीत तर काही वार्ड मात्र जैसे थे आहेत, केदा आहेर व आ.राहुल आहेर यांना मानणारा वर्ग मोठा आहे, तसेच जितेंद्र आहेर यांच्यासारखा चांगला विरोधक आपल्या गोटात घेऊन विरोधकांची ताकद कमी केली. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होणार नाही इतकं खर आहे, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झाल्यास निवडणूक काटे की टक्कर होईल मात्र विरोधकांची दाणादाण बघता भाजपाला नगरपंचायत जास्त अवघड नाही. विरोधकांचे सूर जुळे पर्यन्त भाजपा विजयाच्या दिशेने दोन पाऊले पुढे राहील. त्यात आर्थिक पाठबळ देखील भाजपकडे चांगले आहे, शहरातील पाणी प्रश्न, भ्रष्टाचार, रस्ते हे मुद्दे समोर आल्यास भाजपाच्या अडचणी वाढतील मात्र त्यासाठी विरोधकांची वज्रमुठ एकत्र असली तर शक्य आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादीचे नेते योगेश आबा यांचा शहरात दबदबा व मानणारा वर्ग आहे मात्र कार्यकर्त्यांचे अपूर्ण जाळे व आर्थिक पाठबळ ही खिंड लढायला कमी पडणार हे नक्कीच, युवकचे तालुकाध्यक्ष सुनील आहेर (गोटु आबा) यांना मानणारा वर्ग तालुक्यातील ग्रामीण भागात जास्त आहे, तसेच पंडित निकम, दिलीप आहेर व अन्य नेत्यांना मानणारा वर्ग मर्यादित आहे. हे राष्ट्रवादीचे सर्व जाणून आहेत, निवडणुकीसाठी लागणारी आर्थिक रसद राष्ट्रवादी च्या युवक अध्यक्षांनी ताकद लावली तरच निधी उभा राहील अन्यथा निवडणूक यंत्रणा उभी करणे देखील शक्य नाही. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्व नेते एकत्रित येणे कठीण आहे.

विरोधकांना आघाडी हाच एक पर्याय

गेल्या निवडणुकीत उदयकुमार आहेर, योगेश आहेर व जितेंद्र आहेर यांच्या नेतृत्वाखाली आघाडी तयार करण्यात आली होती सत्ता मिळाली नसली तरी लढत चुरशीची झाली होती, यावेळी जितेंद्र आहेर मात्र सत्ताधाऱ्यांच्या गोटात सामील आहेत. यामुळे विरोधकांची भिस्त उदयकुमार आहेर व योगेश आहेर यांच्यावरच आहे, या नेत्यांनी पुढाकार घेतला अन बाकी सर्व विरोधक एकवटले विकासाचा मुद्दा निवडणुकीत आणल्यास निवडणूक रंजक होईल मात्र विरोधकांमध्ये बेबनाव असला तर निवडणूक एकतर्फी होईल इतकी दयनीय अवस्था इतर पक्षांची झाली आहे. नाना-दादा जोडगोळीचा वारू रोखण्यासाठी विरोधकांना हवी एकजूट…


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here