‘नाना’ ‘दादा’ अंकात सरस कोण ? ; भावडबारी आंदोलन निमित्त….

0
59

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा तालुक्यात शिवसंग्राम भाजपा या राज्यातील मित्र पक्षांची जुगलबंदी चांगलीच रंगलीय, यावेळी निमित्त आहे भाजपा ने पुकारलेले रास्ता रोको आंदोलन अन आश्वासनानंतर घेतलेली माघार.

तालुक्या च्या राजकारणात राजकीय दृष्ट्या तगडे पारडे भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचेच आहे. बाजार समिती, नगरपालिका, जिल्हा बँक, सहकारी संस्था त्यांच्या भोवती असलेले कार्यकर्त्यांचे जाळे हे बघता त्यांना कोणीही अंगावर घेण्याचे धाडस तालुक्याच्या राजकारणात करत नाही, याला आदरयुक्त भीती म्हणावं की अन्य काही हे जनताच जाणे. मात्र नेहमीच केदा आहेर यांना शिंगावर घेण्याचे काम शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश अध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी केले आहे. अनेकवेळा पुरावे सादर करून पोटतिडकीने विषय मांडले आहेत. अनेक विषय कोर्टात देखील गेले आहेत.

हे सर्व होत असतांना केदा आहेर यांनी कधीही आरोपांचे ना खंडन केले न समर्थन केले , जेणेकरून समोरील विरोधक कितीही प्रामाणिक असला लढवय्या असला तरी त्याला महत्व न देता , आम्ही आरोपांची दखल घेत नाही हे वातावरण निर्मितीत केदा आहेर यशस्वी झालेत. नानांनी उत्तर दिल्यास दादा पुन्हा चिरफाड करतील अन जनतेत आपली प्रतिमा खराब होईल हे नाना जाणून आहेत. म्हणून ही शांतीत सुरू असलेली क्रांती राजकारणात फार कमी नेते आत्मसात करत असतात. याचे अनेक अर्थ निघतात विरोधक बरोबरीचा नाही किंवा मग उत्तर न देता विरोधकाला अदखलपात्र करणे.

काल भाजपाने पुकारलेले आंदोलन कसे धूळफेक करणारे होते हे दादांनी व्हिडीओच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवले व कट्ट्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली. याचा परिपाक म्हणावं की काय म्हणून भाजपा ने आज हे आंदोलन रद्द केलं. याला कारण जरी आश्वासनाचे असले तरी चर्चा मात्र वेगळीच झाली अन जनमानसात भाजपा स्थानिक नेत्यांविषयी चुकीचा संदेश गेला. अन या बाजीत दादा मात्र सरस ठरले आहेत हे मान्य करावेच लागेल.

असो देवळा तालुक्यातील नेत्यांना राजकारणाचे अनेक अंक बघायचे आहेत. मात्र रस्त्यांचे कामे लवकर होतील तितकी लोकांची मणके आरोग्य चांगले राहतील, व नेत्यांचे झेंडे उचलायला कार्यकर्ते मैदानात उतरतील. कार्यकर्त्यांना झेंडे उचलून प्रचाराचा धुरळा उडवण्यासाठी का असेना मात्र तालुक्यातील रस्ते व्यवस्थित व्हावेत हीच नेत्यांकडे छोटीसी आपली मागणी.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here