द पॉईंट नाऊ ब्युरो : फोन टॅपिंग प्रकरणी नाथाभाऊंना कुलाबा पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. फोन टॅपिंग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांची चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी एकनाथ खडसेंचा फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता. यात संजय राऊत यांचा देखील फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर होता. याप्रकरणी त्यांची अनेक वेळा चौकशी देखील झाली.
आता एकनाथ खडसे यांची या फोन टॅपिंग प्रकरणी पीडित म्हणून चौकशी केली जाणार असल्याचे, कुलाबा पोलिसांद्वारे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात फोन टॅपिंग प्रकरण समोर आल्यानंतर ते खूप गाजले. यामुळे त्याची चौकशी सुरू झाली. जी सध्या सुरू आहे.
रश्मी शुक्ला या चौकशीत सहकार्य करत नसल्याने उच्च न्यायालयात त्यांच्या जामीनाला पोलीस आपला विरोध दर्शवणार आहेत.
आता एकनाथ खडसे यांच्या चौकशीतून अजून याबाबत काही समोर येते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम