राजकीय वर्तुळात चर्चेत असणारे अमरावतीचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा सध्या जामीन मिळताच रूग्णालयात दाखल केले. रूग्णालयातून बाहेर येताच जामीनावर सुटका झाल्यानंतर राणा दाम्पत्य दिल्लीत पोहोचलं आहे. राणा दाम्पत्य दोघांनी ठाकरे सरकारचा निषेध व्यक्त करत दिल्लीतील प्राचीन हनुमान मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसा पठण केलं. ठाकरे सरकारला सद्बुद्धी यवी यासाठी महाआरती घेतल्याचे राणा दाम्पत्यानं म्हटलं.
राणा दाम्पत्याच्या टीकेनंतर आता शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी सडकून शब्दात टीका केली आहे. दिपाली सय्यद यांनी याबाबतचं एक ट्विट केलं आहे. “आता राणा दाम्पत्याला औरंग्याच्या दर्ग्यात घुसून हनुमान चालीसा वायाचला दिल्लीवरुन आदेश आला नाही का? नाटक कंपनी माकडचाळे फक्त दिल्लीच्या डोंबऱ्यांकडून फोन आल्यावरच करणार का?”, असं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलं आहे.
देशातील पहिल्या नंबरचे सक्षम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी नव्हे, तर मोदींसाठी संकट आहेत. मोदींचे संकट आपल्या अंगावर घेणाऱ्या राणाबाई तुम्ही चालत या किंवा उडत या…शिवसेना तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी खोचकपणे टिका करत दिपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राणा दाम्पत्यानं आज नवी दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरापासून ते कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरापर्यंत पदयात्रा करून महाआरती देखील केली. यावेळी नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठण देखील केलं. रवी राणा यांनी ठाकरे सरकारला सद्बुद्धी यावी अशी प्रार्थना भगवान हनुमानाकडे केली आहे. तसंच उद्धव ठाकरेंनी आजच्या जाहीर सभेची सुरुवात हनुमान चालीसाने करून दाखवावी, असंही नवनीत राणा निशाणा साधला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम