नांदगाव , खर्डे (वा) येथे संविधान दिवस साजरा…!

0
8
खर्डे येथे संविधान दिन साजरा

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून शुक्रवारी( दि २६) रोजी नांदगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. दुय्यम निबंधक योगेश खैरनार यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.प्रसंगी सर्व कर्मचारी, नागरिक व उपस्थित होते.

नांदगाव येथे दुय्यम निबंधक कार्यालयात संविधान दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतांना सहायक निबंधक योगेश खैरणार आदी

देवळा : खर्डे ता देवळा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान दिन व २६ /११ च्या मुंबई बॉम्ब स्फोट हल्ल्यात शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली .यावेळी शरद आहिरे , बाळा जाधव, ललित आहिरे , नितीन आहिरे, प्रकाश आहिरे , कृष्णा आहिरे ,आनंद आहिरे ,आकाश आहिरे ,विश्वास आहिरे, सिद्धार्थ आहिरे, स्वप्नील जाधव, रोहित जाधव, अरुण आहिरे, भवराव आहिरे ,राजेंद्र आहिरे, यश निरभवने, संदीप जाधव, तुषार आहिरे, गणेश आहिरे, भिका जाधव, सचिन आहिरे, देविदास आहिरे आदी समाज बांधव उपस्थित होते

खर्डे येथे संविधान दिन साजरा

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here