नितीन गुंजाळ
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नवोदय विद्यालयासाठी निवड होणे या गोष्टीकडे विद्यार्थी वर्गासाठी एक संधी म्हणून पाहिले जाते. जवाहर येथील नवोदय विद्यालयासाठी झालेल्या निवड चाचणी परीक्षेद्वारे नुकतीच विविध विद्यार्थ्यांची निवड झाली. यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा नुकताच महाराष्ट्र आदिवासी शिक्षक संघटना दिंडोरी मार्फत सत्कार समारंभ पार पडला. नाशिक जिल्ह्यातील निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या द्वारे पार पडला.
या प्रसंगी कळवण सुरगाणा मतदार संघ आमदार नितीन पवार, साक्री मतदार संघ आमदार मंजुळाताई गावित, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग उपायुक्त संदीप गोलाईत आदी यावेळी उपस्थित होते.
या समारंभात अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेचे शिक्षक योगेश पवार व योगिता पवार यांची कन्या कृतिका पवार हिचा देखील सत्कार करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम