नवी शेमळीत हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

0
34

स्वप्निल अहिरे, प्रतिनिधी : बागलाण तालुक्यातील नवी शेमळी येथे जुन्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा तीन दिवस भक्तिमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. हनुमान मूर्ती बरबर श्री गणेशा शिवपिंड तसेच गावातील ग्रामदैवत आई तुळजाभवानी यांच्या मूर्तीची देखील प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

१२ मार्च रोजी सकाळी आठ वाजता वाजत गाजत अकरा बैलगाडी मांडव मिरवणूक संपूर्ण गावात काढण्यात आली. यामध्ये गावातील सर्व ग्रामस्थ महिलांनी सहभाग घेतला, यामुळे नवी शेमळी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते, शिवतीर्थ प्रतिष्ठान नवीशेमळी तर्फे भाविकांना नाश्ता ,चहा वाटप करण्यात आली, ह्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी गावातील पाच जोडप्यांनी सहपत्नी पूजा, विधी, पुरोहित पप्पू जोशी यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाली पहिल्या दिवशी सायंकाळी ह.भ.प. प्रकाश महाराज कंधाणेकर यांचे कीर्तन सेवा संपन्न झाली, दुसऱ्या दिवशी दिवसभर पूजा विधी संपन्न झाली, रात्री ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज कंधाणेकर यांची कीर्तन सेवा झाली, यावेळी कीर्तन सेवेसाठी ब्राह्मणगाव येथील गायक सम्राट तेजस जाधव यांच्या भक्तीपर गाण्यांवर गावातील महिला ,तरुण युवक, ज्येष्ठ नागरिकांनी ठेका धरला होता.

तिसऱ्या दिवशी संपूर्ण विधीवत पूजा अर्चा संपल्यानंतर ह.भ.प. पोपट महाराज कपालेश्वरकर यांच्या हस्ते कलश पूजन करून कळस मंदिरावर चढविण्यात आला. यानंतर आरती करून भव्य महाप्रसाद वाटप करण्यात आला. या सर्व कार्यक्रमांसाठी श्रीराम भजनी मंडळ जुनी शेमळी समस्त ग्रामस्थ नवी शेमळी यांचे विशेष सहकार्य लाभले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here