नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर; जेजे रुग्णालयात दाखल

0
27

नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे.

नवाब मलिक यांना तुरुंगात पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्ट्रेचरवरून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली असल्याने मानवतावादी आधारावर अंतरिम वैद्यकीय जामिनासाठी मागणी करणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे. 23 फेब्रुवारीला ईडीने आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अटकेच्या कारवाईचा निषेध केला.

जामिनाला विरोध करणार असल्याचे ईडीच्या वकिलांनी म्हटले आहे. त्यांच्या प्रकृतीची माहिती अगोदर का देण्यात आली नाही, अशी विचारणा त्यांनी केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या अटकेला आव्हान देणारी महाराष्ट्र मंत्रिमंडळातले मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा फेटाळून लावली आहे. ही केस प्रारंभिक टप्प्यावर असून त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here