नाशिक प्रतिनिधी : गेल्या आठवड्यात वैद्यकीय अधिकारी वाजे यांचा विल्लोळीनजीक मुंबई-आग्रा राेडवरील रायगड नगरजवळ जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. कौटुंबिक वादातून डॉ वाजे यांचा घातपात झाला असून याप्रकरणी पती संदीप वाजे यास पोलिसांनी अटक केली आहे. अशी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.
आज तालुका पोलीस स्टेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, गेली अनेक वर्षे डॉ वाजे यांच्या घरात कौटुंबिक वाद होते. त्यामुळेच ही घटना घडली आहे. डीएनए अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी कसून तपास करण्यास सुरुवात केली होती. डाॅ. वाजे यांचे पती संदीप वाजे याची काल (दि ०२) रोजी बराच वेळ चौकशीदेखील झाली. यानंतर या घटनेची उकल झाली असून मुख्य आरोपी संदीप वाजे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तसेच अजून यात संशयित आहेत, मात्र त्यांची नावे सध्यातरी सांगता येणार नाहीत अशी माहितीही पोलीस अधिक्षक पाटील यांनी दिली आहे. ठेकेदार असलेल्या संदीप वाजेसोबत आणखी या गुन्ह्यात कोण कोण सहभागी आहे हे मात्र सांगण्यात आलेले नाही. पण, यात कुठलेही राजकीय कारण नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम