द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : एस. टी. महामंडळाने नवख्या चालकाच्या हातात बसचे स्टेरिंग दिल्याने, अपघाताची घटना पुण्यातील हडपसर येथे घडली.
एस. टी. महामंडळाच्या आणि संपकरी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या अट्टहासापायी आता मात्र प्रवाशांचा जीव धोक्यात घातला जाऊ लागला आहे. केवळ एका दिवसाचे प्रशिक्षण देऊन एस. टी. महामंडळाने एका खाजगी वाहन चालकाच्या हातात बसचे स्टेरिंग दिले आणि त्याच्या परिणाम स्वरूप इंदापूर – पुणे बसच्या अपघाताची घटना हडपसर परिसरात घडली.
केवळ एका दिवसाच्या प्रशिक्षणावर एस. टी. महामंडळाची बस चालवणाऱ्या चालकाला बसचा अंदाज आला नाही आणि त्याने बस थेट समोरच्या टँकरला मागुन ठोकली. यामुळे हा अपघात घडला. सुदैवाने यात कोणालाही काही झाले नाही, मात्र बसचे नुकसान झाले.
एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरूच असल्याने आता एस. टी. महामंडळाने खाजगी वाहन चालकांना बस सोपवली. यामुळे प्रवाशांचे जीव मात्र टांगणीला लागत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम